वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

एकली एकटची होती ये स

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089802 · अभंग क्र. १९१

191.
एकली एकटची होती ये सदनी ।
तव आयीकिली मुरलीची ध्वनी ॥
गेले धावोनिया पहावया लोचनी ।
तव गेलिये देहभाव विसरोनी ॥१॥
हरि देखतांची मदनाचा पुतळा ।
गेला जडोनिया बैसला तो डोळा ॥
मनी आठवे साजणी वेळोवेळा ।
नेल्या शोषुनी माझीया जीवनकळा वो ॥२॥
नव्हते जवळी दुसरे बाई कोणी ।
नको जाऊ ऐसे सागावया लागुनी ॥
नेईल जीवभाव सर्व हा हरुनी ।
मग पडसि तू याचेचि व्यसनी वो ॥३॥
ऐसि जाजावोनि बोले सखियाप्रती ।
येरी टकमका पाहोनि हासती ।
म्हणती जाणोनिया होसि का नेणती ।
भाग्ये लाधलिसी धरुनी राहे चित्ती वो ॥४॥
आजि तुझिया भाग्यासी नाही पार ।
झाला परिचय पाहिला सारंगधर ।
ज्यालागी शिणति हे योगी मुनीश्वरा ।
तोचि तुझे ह्रदयींचा परात्पर वो ॥५॥
निळा म्हणे मोडोनि वैभवा वैभव ।
सकळहि सुखचीच जोडली राणिव ।
देखिला यदुपति निजलावण्याची ठेव वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग