वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

सार निःसार निवडूनि ट

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090150 · अभंग क्र. १९१

191.
सार निःसार निवडूनि टाकीन । सर्व हा होईन आत्माराम ॥1 ॥१॥
राम सर्वा घटी बिंबलासे आम्हा । पूर्ण ते पूर्णिमा सोळाकळी ॥2 ॥२॥
न देखो दूजे हरिविण आज । आणिकाचे काज नाही तेथे ॥3 ॥३॥
निवृत्ति गौरव गुरुमुखे घेत । आपणचि होत समरसे ॥4 ॥४॥

अर्थ:
ज्ञान प्राप्त झाल्यावर मी सार व निसार निवडुन घेऊन त्या आत्मारामाचा होऊन जाईन.जसा चंद्र प्रतीपदा ते पोर्णीमा मध्ये 16 कला दाखवत आपली प्रतीमा बिंबवत असतो तसा तो आत्माराम सर्व मध्ये अंशात्मक रुपात सर्वत्र बिंबत असतो.मला हरिभक्ती शिवाय कोणतेच काम राहिले नसुन मला त्या हरि शिवाय दुसरे काही दिसत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात, मी माझ्या श्री गुरु गहिनीनाथांकडुन त्या आत्मारामाचा गौरव ऐकला आहे व मी त्याच्याशी समरस झालो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग