वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

एक ना दुसरे वो नव्हत

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089769 · अभंग क्र. १९०

190.
एक ना दुसरे वो नव्हते मजपांशी ।
मी मज नोळखता आप आपणासी ।
होति ये निर्जनी वो निराभास देसी ।
नेणो कोणे आणियेले कर्मभूमिसी ॥१॥
तैंसपासूनिया विसरले निजसुखा ।
वाटे जीव माझाचि परि मज वो पारिखा ।
देखोनि आपपर पात्र जाले बहु दु:खा ।
सांगो कोणापासि सये जाला ऐसा वाखा वो ॥२॥
मी मज माझियानि वेढाळिले बाई ।
चित्तासि या चिंतने वो घातले प्रवाही ।
नेणेचि विश्रांति कोठे विचरता मही ।
जेथूनिया आलिये ते नाठवेचि काही वो ॥३॥
नसतेचि काम क्रोध लागले हे वैरी ।
येऊनिया आशा चिंता बैसल्या जिव्हारी ।
व्दैषनिंदेचिया नित्य नाना भरोवरी ।
कामना कल्पना ह्या दाटल्या शरीरी वो ॥४॥
किती तरी करु या संसारा पुरवणी ।
किती सोसू येऊ जाऊ यमाची जाचणी ।
किती येऊ जाऊ भोगू नाना यातिचिया खाणी ।
किती गर्भवासी बैसो थर अडचणि वो ॥५॥
ऐसि जाजावलि बहु अनुतापे बाळा ।
घेऊनिया विकृतिया विषयाचा कंटाळा ।
मनोभावे चिंतिला बा श्रीरंग सावळा ।
पावली निजस्थान पुनरपि म्हणे निळा वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग