वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ७, संत ज्ञानेश्वर गौळणी

जयाचिये आवडी संसार त

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073178 · अभंग क्र. १९१

191.
जयाचिये आवडी संसार त्याजिला । तेणे का अबोला धरिला गे माये ।
पाया दिली मिठी घातली जीवे गांठी । साऊमा नये जगजेठी उभा ठेला गे माये ॥१॥
भेटवा वो त्यासी चरण झाडीन केशी । सगुण रूपासी मी वो भाळलीये ॥धृ॥
क्षेमालागी जीव उतावेळ माझा । उचलोनि चारी भुजा देईन क्षेम ।
कोण्या गुंणे का वो रुसला गोवळू । सुखाचा चावळू मजसी न करी गे माये ॥३॥
ऐसे अवस्थेचे पिसे लावियेले कैसे । चित्त नेले आपणिया सरिसे गे माये ।
बापखुमादेविवरे लावियले पिसे । करूनि ठेविले आपणिया ऐसे गे माये ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग