वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ७, बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८

तुझिये निढळ कोटि चंद

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074890 · अभंग क्र. १८६

186.
तुझिये निढळ कोटि चंद्र प्रकाशे ।
कमल नयन हास्य वदन हासे ॥
कृष्णा हाल का रे कृष्णा डोल का रे ।
घडिये घडिये घडिये गुज बोलका रे ॥
उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो ।
बाप रखुमादेविरु विठ्ठलु नाहो ॥

अर्थ :
तुझ्या कपाळी कोटी चंद्राचा प्रकाश आहे. हे कमलनयना तु आम्हाला तुझे हास्य दाखव. हे कृष्णा तु जरा हाल व डोल व घडीभर तरी आमच्या बरोबर हित (आमचे) -गुज ( तुझे ज्ञान) कर. माझे पिता व रखुमाई पती श्री विठ्ठल उभे राहुन कशा बाह्य हालवतात ते पहा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग