वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

संत निळोबारायांच्या

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089801 · अभंग क्र. १८९

189.
संत निळोबारायांच्या विरहिणी

आजि पुरले वो आतीचे आरत ।
होते ह्रदयी वो बहु दिवस चिंतित ।
मना आवरुनि इंद्रया सतत ।
दृष्टी पाहो हा धणिवरी गोपिनाथ वो ॥१॥
तेचि घडोनिया आले अनाययसे ।
जाता यशोदे घरा वाणचिया मिसे ।
आला खेळत खेळत बाळवेषे ।
कवळी घालि मिठी गदगदा हांसे वो ॥२॥
मुख अमृताचा मयंक उगवला ।
दंत हियाचा प्रकाश फांकला ।
नयनी रत्पकीळ तारा वो चमकला ।
देखता ह्रदयी निजवास त्याचा झाला वो ॥३॥
जन्म जन्मांतरी बहु केले सायास ।
याचे भेटिलागी व्रते उपवास ।
सेविली गंगेची तटाके उदास ।
त्याचिया सुकृताचे आले नेणो घोष वो ॥४॥
आजि आनंदाशी आनंद माझया झाला ।
आजि सुखशी सुखे लाभ केला ।
आजि हर्शाषीं हर्ष भेटो आला ।
तेणे श्रीरंग निजदृष्टी स्थिरावला वो ॥५॥
भोग भोगिता वो सरले समस्त ।
गेले उडोनिया प्रारब्ध संचित ।
विटले विषयावरुनिया चित्त ।
निळा म्हणे घडला हरिशी एकांत वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग