माझ्या कान्हाचे तुम्
193.
माझ्या कान्हाचे तुम्ही नाव भरी घ्यावो । हृदयी धरोनि यासी खेळावया न्यावो ॥१॥
भक्तांकारणे येणे घेतलीसे आळी । दहा गर्भवास सोसिले वनमाळी ॥२॥
कल्पनेविरहित भलतया मागे । अभिमान सांडुनी दीनापाठी लागे ॥३॥
शोषिली पुतना येणे तनू मोहियेले तरु । आळी न संडी बापरखुमादेविवरु ॥४॥
