बळीराम व अक्रूर यांच
185.
बळीराम व अक्रूर यांची भेट व नंदगृही अक्रूरपूजन
भेट देई मज ह्मणे बळीराम । न वर्णवे प्रेम अक्रूराचे ॥१॥
पेंद्यासी पुसती अवघे गडी तेव्हा । कोणरे हा बावा आला येथे ॥२॥
आपुल्या कान्होबाच्या पाया का पडतो । काय हा मागतो सांग आह्मा ॥३॥
अक्रूर बळिराम घरी आले गोपाळ । मंदादि सकळ भेटीयेले ॥४॥
मधुपर्कविधि करीती पूजन । ह्मणे धन्य दीन आईचा हा ॥५॥
अक्रूराबरोबरी करिती भोजन । पुसे वर्तमान मग त्यासी ॥६॥
भक्त माझे दैवत जगा दावी मात । कृपाळु बहुत नामा ह्मणे ॥७॥
