कृष्णरुपा वेधिल्या न
184.
कृष्णरुपा वेधिल्या नारी ।
देखती अंतरी तेचि रुप ॥१॥
गमनी शयनी आसनी भोजनी ।
देखती जनी वनी दृष्टीपुढे ॥२॥
एकांती लोकाती घरी दारी बाहेरी ।
त्याविण निजाचारी नेणती दुजे ॥३॥
निळा म्हणे सर्वहि त्याचा परिवार ।
होवोनी सारंगधर ठेला घरी ॥४॥
