एक पांच सात मिळोनि ख
186.
एक पांच सात मिळोनि खेळती विटिदांडु । डाव आलिया पळूणि जाता तया म्हणती गांडु ॥१॥
खेळों विटिदांडु खेळॊं विटिदांडु ॥धृ.॥ मुळींचा दांडुं हाती धरुनि भावबळें खेळू खेळा । भक्तिबळे टोला मारुं नभिऊ कळिकाळा ॥२॥ आपुली याची सांडोनि आस जावे गुरुसी शरण । काया वाचा मने चरणींलोळे एका जनार्दन ॥३॥
