वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ७, संत ज्ञानेश्वर गौळणी

लक्ष लाऊनि अंतरी । क

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073174 · अभंग क्र. १८८

188.
लक्ष लाऊनि अंतरी । कृष्णा पाहती नर नारी ।
लावण्यसागरू हरी । परमानंदु ॥१॥
छंदे छंदे वेणू वाजे । त्रिभुवनी घनु गाजे ।
उतावेळ मन माझे । भेटावया ॥धृ॥
ब्रह्मविद्येचा पुतळा । गाई राखितो गोंवळा ।
श्रुति नेणवे ते लीळा । वेदा सनकादिका ॥३॥
भूतग्रामींचा परेशु । तापत्रयाचा करी नाशु ।
आड धरुनी गोपवेषु । वत्से राखे ॥४॥
रासक्रीडा वृंदावनी खेळे । इंदुवदन मेळे ।
उद्धरी यदुकुळे । कुळदीपके ॥५॥
निवृत्तीदासाचा दातारू । बापखुमादेविवरू ।
भक्ता देतो अभयकरू । क्षणांक्षणांमाजी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग