प्राकृत संस्कृत एकचि
190.
प्राकृत संस्कृत एकचि मथीत । गुरुगम्य हेत पुराणमहिमा ॥१॥
वेदादिक मत शास्त्र हे बोलत । श्रुतीचा संपत वाद जेथे ॥२॥
पृथ्वी हे ढिसाळ आकाश कव्हळ । जन्म मायाजाळ विरत जेथे ॥३॥
निवृत्ति म्हणे गुरु गयनि सौरसे । आपण जगदीश सर्वारूपी ॥४॥
अर्थ:
हरि प्राप्ती करुन घेणे हा प्राकृत किंवा संस्कृत ग्रंथांचा, पुराणांनी किंवा गुरुनी सांगितलेला हेतु असतो. हरिप्राप्तीसाठी वेद व त्यांचे उपांग शास्त्र बोलत असते व श्रुतींचा वाद ही त्या हेतुशी संपत असतो. माये मुळे जन्मलेल्या जीवाला ब्रह्मरुप झाल्यावर माया निवृत करता येते तसे पृथ्वीचे ढिसाळपण व आकाशाचे कवटाळणे त्या ब्रह्म स्वरुपात लय पावते. निवृतिनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथांच्या कृपा सौरसाने तो जगदिश मला सर्व रुपात दिसत आहे.
