त्या वैष्णवांच्या मा
185.
त्या वैष्णवांच्या माता । तो नेणे देवताता ॥1॥
तिही कर्मे हे पुसिले । अकर्म समूळ नाहीसे केले ॥2॥
कानाचा हो कान । झाले धरुनिया ध्यान ॥3॥
डोळियाचा हो डोळा । करुनी झाले प्रेम सोहळा ॥4॥
तोही वसे नरदेही । जनी दासी वंदी पायी ॥5॥
