देव न सापडे मना ।
189.
देव न सापडे मना ।
तरी जावे वृंदावना ॥१॥
तेथे होय समाधान ।
स्वये भेटे नारायण ॥२॥
देव हारपला ज्याचा ।
वृंदावनी भेटे साचा ॥३॥
बहेणि म्हणे भाव खरा ।
पाहिजे तो गाठी बरा ॥४॥
189.
देव न सापडे मना ।
तरी जावे वृंदावना ॥१॥
तेथे होय समाधान ।
स्वये भेटे नारायण ॥२॥
देव हारपला ज्याचा ।
वृंदावनी भेटे साचा ॥३॥
बहेणि म्हणे भाव खरा ।
पाहिजे तो गाठी बरा ॥४॥