कुवलयपीड हत्तीचा उद्
190.
कुवलयपीड हत्तीचा उद्धार
इच्छामात्रे मोडी ब्रह्मांडाच्या कोटी । चालिला जग-जेठी कंसद्वारा ॥१॥
मदोन्मत्त हस्ती देखोनिया हांसे । पीतांबर कांसे खोवियेला ॥२॥
सांवरोनी हाते केंसा देत गांठ । खोंवितसे नीत वैजयंती ॥३॥
खंब ठोकोनिया राहे पुढे उभा । सांवळी सुप्रभा अंगकांती ॥४॥
पाहोनिया शूक झाला समाधिस्थ । ऋषिमुनी समस्त वेडावले ॥५॥
दुष्ट पाही हत्ती घाली आंगावरी । क्षणार्धेंचि मारी गजालागी ॥६॥
उपडोनिया दात घेतसे श्रीधर । जाहला उद्धार कुवलयाचा ॥७॥
नामा म्हणे पुढे चालिला गोविंद । सावध सावध परिक्षिती ॥८॥
