सर्वस्वा मुकावे तेणे
191.
सर्वस्वा मुकावे तेणे हरीसी जिंकावे । अर्थ प्राण जीवे देहत्याग ॥१॥
मोह ममता माया चाड नाही चिंता । विषयकंदुवेथा जाळूनिया ॥धृ॥
लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशधडी ॥२॥
शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी त्यासी ॥३॥
तुका म्हणे याती अक्षरे अभिमान । सांडोनिया शरण रिघे संता ॥४॥
