(काला व खेळया संबंधी
3676.
(काला व खेळया संबंधीचे अभंग)
आम्हा निकट वासे । कळो आले जैसे तैसे । नाही अनारीसे । कान्होबाचे अंतरी ॥१॥
पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना । कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥धृपद॥
खेळ खेळे न पडे डाई । ज्याचा भार त्याच्या ठायी । कोणी पडतील डाई । कोणी कोडी उगवीती ॥२॥
तुका म्हणे कवळ । हाती घेऊनि गोपाळ । देतो ज्यांचे बळ । त्यांसि तैसा विभाग ॥३॥
अर्थ :
आम्ही श्रीकृष्णाच्या जवळ राहत असल्यामुळे श्रीकृष्णाचे मन कसे आहे, ते आम्हाला कळाले आहे त्याच्या मनात कुनाबद्दल विषम भाव नाही. ज्याच्या अंगी जी भावना असेल, त्या प्रमाणे ती त्याला पीड़ा देते तो भगवंत सर्व कर्मांचा साक्षी आहे साऱ्या लीला तो कौतुकाने पाहत असतो. तो सर्व खेळ खेळतो; पण डावात अडकवत नाही ज्याचा त्याचा भार ज्याच्या त्याच्याजवळ ठेवतो कुणी डावात सापडतात, तर कुणी त्या डावाच्या कोडयातु सुटून जातात. तुकाराम महाराज म्हणतात, गोपाळाने काल्याचा घास घेऊन ज्याचे जैसे बळ होते, त्यानुसार त्यांना त्यांचा भाग दिला.
