आजी मी तयाचे न पाहता
3672.
आजी मी तयाचे न पाहता चरण । देईन आपुला प्राण याचिक्षणीं ॥१॥ जाणोनी निर्धार सांवता बोले त्यासी । ह्रदयनिवासी आत्माराम ॥२॥ अभिमानें नाडले प्रपंचीं भागले । ते या श्रीविठ्ठले उध्दरिले ॥३॥ नामदेव तुज तंव नाही अभिमान । मग कळली खूण अंतरांत ॥४॥ एका जनार्दनी सदगद होउनी । मिठी घाली चरणी सांवत्याच्या ॥५॥
