वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(सीताशोक)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079894 · अभंग क्र. ३६५१

3651.
(सीताशोक)
झाले रामराज्य काय उणे आम्हासी । धरणी धरी पीक गाई वोळल्या म्‍हैसी ॥१॥
राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये । दिळता कांडिता जेविता गे बाइये ॥धृपद॥
स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा । नामाच्या गजरे भय सुटले कळीकाळा ॥२॥
तुका म्हणे रामे सुख दिले आपुले । तया गर्भवासी येणे जाणे खुंटले ॥३॥

अर्थ :
सर्वत्र आता रामराज्य झाले आहे त्यामुळे आम्हाला कसली कमतरता आहे धरणी भरपूर पीक देत आहे गाई म्हशी भरपूर दुध देत आहेत. हे बायांनो आपण रामाच्या ओव्या वेळोवेळी म्हणजे दळताना, कांडताना, जेवताना गाऊ. स्वप्नातही कोणाच्या डोळयाला दु:ख काय आहे ते दिसणार नाही आणि रामनामाच्या गजराने तर कळीकाळाला देखील भय सुटले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रभू रामचंद्राने आपले आत्मसुख आपणा सर्वांना दिले त्यामुळे जन्ममरणाचे गर्भवास व येरझारे खुंटले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग