वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(सीताशोक)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079466 · अभंग क्र. ३६४६

3646.
(सीताशोक)
पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥१॥
अवघे लंकेमाजी झाले रामाचे दूत । व्यापिले सर्वत्र बाहेरी भीतरी आत ॥धृपद॥
अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥२॥
तुका म्हणे ऐक्या भावे रामेसी भेटी । करूनि घेई आता संबंधेशी तुटी ॥३॥

अर्थ :
हे भूपती रावणा पलीकडे राम वानरसेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्यासाठी आला आहे असे रावणाचे दूत रावणाला सांगत आहेत व त्याला म्हणत आहेत तू अजूनही का असावधपणे झोपलेला आहेस ? अरे त्या रामाचे दूत म्हणजे वानर सर्व लंकेत घुसले आहेत प्रत्येकाच्या घरात बाहेर ते व्यापून उरले आहेत. अरे तुझे अतिशय प्रिय आणि शूरवीर असे योध्दे यांनी मारले आहे त्यामुळे तू प्रभू श्रीरामचंद्रांना शरण तरी जा किंवा युध्दासाठी तयार तरी व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात, आणि पुढे ते सेवक रावणाला म्हणतात की आता तू एकनिष्ठेने प्रभू रामचंद्रांना शरण जा आणि सर्व संसारीक संबंध टाक म्हणजे झाले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग