वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(घोंगडीची रूपके)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079363 · अभंग क्र. ३६५५

3655.
(घोंगडीची रूपके)
घोंगडियांचा पालट केला । मुलांमुला आपुल्यांत ॥१॥
कान्होबा तो मीच दिसे । लाविले पिसे संवगडिया ॥धृपद॥
तो बोले मी उगाच बैसे । आनारिसे न दिसे ॥२॥
तुका म्हणे दिले सोंग । नेदी वेंग जाऊ देऊ ॥३॥

अर्थ :
आम्ही मुलांनी एकदा एकमेकांच्या घोंगडींची अदलाबदल केली. आम्ही मुले मुले म्हणजे कान्होबा व आम्ही सर्व सवंगडी माझ्या अंगावर कान्होबाची घोंगडी आली व मी कान्होबासारखाच दिसू लागलो व सर्व मला कान्होबा समजू लागले मग मी सर्व सवंगड्यांना वेड लावले. तो कृष्ण बोलू लागला की, मी उगाच गप्प बसून राहायचो परंतू त्याच्यात आणि माझ्यात मला काहीच बदल वाटत नव्हता. तुकाराम महाराज म्हणतात, जे हरीने मला घोंगडी देऊन सोंग दिले त्या सोंगाला मी व्यर्थ वाया जाऊ देणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग