चोख्याचे अंगणी बैसल्
3682.
चोख्याचे अंगणी बैसल्या पंगती । स्त्री ते वाढिती चोखियाची ॥१॥ अमृताचें ताट इंद्रें पुढे केले । शुध्द पाहिजे केले नारायणा ॥२॥ तेव्हा देवराव पाचारी चोखियासी । शुध्द अमृतासी करी वेगी ॥३॥ चोखामेळा म्हणे काय हे अमृत । नामापुढे मात काय याची ॥४॥ अमृताचे ताट घेउनी आला इंद्र । हेतु गा पवित्र करी वेगी ॥५॥ चोखियाची स्त्री चोखा दोघेजण । शुध्द अमृत तेणे केले देखा ॥६॥ चोखियाच्या घरी शुध्द होय अमृत । एका जनार्दनी मात काय सांगू ॥७॥
