उपवर ती कांता जाहली
3645.
उपवर ती कांता जाहली असे जाण । गोर्याची वासना नाही कामीं ॥१॥
विठोबाची आण घालोनि निरविलें । उभयतां ते वहिले पाळा तुम्ही ॥२॥
सांगूनिया बध्द आपुल्या ग्रामा गेला । पुढे काय विचार जाहला परियेसा ॥३॥
एका जनार्दनी सुखरुप तिघें । कामधाम वेगे करिताती ॥४॥
