देऊळ बांधिले कळस साध
3688.
देऊळ बांधिले कळस साधिले । स्थापन ते केले लिंगाप्रती ॥१॥ पाया जो खांदला मध्येचि भंगला । शब्द मावळला काय सांगों ॥२॥ वरिल्या मंडपा मुंगीये धरिले । त्रिभुवनी व्यापिले मकुड्यानें ॥३॥ एका जनार्दनी मंडप उडाला । देवही बुडाला देवळा सहित ॥४॥
