बैसोनी निकटीं सांवत्
3671.
बैसोनी निकटीं सांवत्याजवळीं । का हो वनमाळी न दिसे मज ॥१॥ का हे कर्म आड आजी आलेंसें बाड । न दिसे उघड विठु माझा ॥२॥ कोणत्या लिगाडें पाडिलीसे तुटी । का हो जगजेठी अंतरला ॥३॥ मजविण क्षण तयासी कंठेना । एका जनार्दनी मना कठिण केले ॥४॥
