वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(सीताशोक)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079448 · अभंग क्र. ३६४५

3645.
(सीताशोक)
राम म्हणता तरे जाणता नेणता । हो का यातिभलता कुळहीन ॥१॥
राम म्हणता न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥धृपद॥
राम म्हणे तया नये जवळी भूत । कैचा यमदूत म्हणता राम ॥२॥
राम म्हणता तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणता राम ॥३॥
तुका म्हणे हे सुखाचे हे साधन । सेवी अमृतपान एका भावे ॥४॥

अर्थ :
जो मनुष्य मुखाने रामनाम घेतो मग तो ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो कोण हीन असो किंवा कोणत्याही जातीचा असो त्याचा उध्दार होतोच. रामनाम घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सायास, कष्ट करावे लागत नाही रामनामाचे उच्चार केले असता महादोषही जळून जातात. मुखाने राम म्हटले तर जवळ भूतही येत नाही आणि यमदूतही येत नाहीत. मुखाने रामनाम घेतले की भवसिंधू तरुन पार जाता येते आणि जन्ममरणाचे येरझार चुकतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोकहो रामनाम हेच सुखाचे साधन आहे व तेच नामामृतपान एकनिष्ठ भक्तीभावाने सेवन करा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग