वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 145. जोशी ३६८९ ते ३६९३

संचित बरवे लिहीलें ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090308 · अभंग क्र. ३६९०

3690.
संचित बरवे लिहीलें । भाग्यवंता भाग्य/ चांगलों कन्यापुत्र पोटपिकले । वेल मांडवा जाईल ॥१॥ फार दैव दुणावेल । पोटभर दोंद सुटेल । गाईम्हशीनें वाडे भरतील । उत्कृष्ट दुभतेंहोईल ॥२॥ आहे सदैव तुमचा वाडा । रोग जाईलतुमची पीडा । सज्ज जोड्या बसावया घोडा । विघ्ने जातील देशोधडा ॥३॥ यांत भुलू नकाजाईल नेट । रामनाम भजे झटपट । आहार निद्राकाम लटपट । लोभाची भारी खटपट ॥४॥ मायेचाबाजार हाट । पुढे अवघड घाट नीट । दुरून आलोंमी या पेठ । सांगतो तुम्हांला नीट । चित्त देऊनिऐका खुणा गा ॥५॥ आया बाया सांगतो नाणी । तुम्ही अवघिया धरा ध्यानीं । उठता बैसता शयनी । कांडीता दळण कांडीन ॥६॥ माता पिता बंधुबहीणी । बाळ भ्रतार सुखाची मांडणी । अंतकाळीयेईना कोणी । एकले जावे स्वर्गासी ॥७॥ कोणीसंत येतील घरा । त्यांचा आदरमान करा । अतीतअभ्यागत येती द्वारा । त्याला काही तरी दान करा । हृदयी आठवा पंढरीनाथ॥८ । लगबगा जलदीलामोल । देहगांवचा होरा जाईल । हे डोळे गांवी.दिवस मावळेल । कानपूरचे कवाडे लागतील ॥९॥ तोंडापूर ओस पडेल । दांतवाडीचा मार्ग मोडेल । नाक गांवी गळती लागेल । सरतीचा डौलबिघडेल ॥१०॥ मग सरेल अवघी हवा । कांहीविचार आपुल्या जीवा । कांही घडली नाही सेवा । शुद्ध हरपेल गाळ वेडगांवा । बैसली जागाउठवेना ॥११॥ जेणे अंधळे भोळे अज्ञान । यांनागुरूसंत देती ज्ञान । दिला मंत्र तो घर बुडवुन । आपुल्या स्वहिताकारणें । साठसहस्त्र ऋषीजनदुर्वास श्रेष्ठ भोजन ॥१२॥ ह्या कंसाचें घरी । सहामहिने अवद भारी । मिष्टान्न नानापरी । अंती गेलेयमपुरीं । सेवकिला दुर्योधना ॥१३॥ महासंकटेआली थोर । यमपुरीची ऐका खबर । ऐशी हजारकोस चौफेर । तिथे नरककुंड अघोर । भारी दु:खाचेंडोंगर । समर्थ राजा इंद्र गरीबाचा पाड काय बरे ॥१४॥ तळमळ व्यथा भोगिती । ऐकावयाची गती । वडील करूणा भाकीती । वैश्य कल्याण चिंतीती । दया नाही उपाय चालेना गा ॥१५॥ सांगतोअनुसंधान । हित होईल तुमचे कारण । संतांचेसंगतीने पंगती पवित्र पावन ॥१६॥ द्वारीतुळशीवृंदावन । एकादशी व्रत नेमाने । हरिदासाचेसंगतीनें । हरिकथा पुराण श्रवणा ॥१७॥ कोटीकुळ्या होतील पावन । वैकुंठी त्यांचे पेण । एकाजनार्दनी सांगतो प्रसन्न । नाम श्रेष्ठ पतीतपावनगा ।॥१८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग