येऊनिया कांता सांगे
3656.
येऊनिया कांता सांगे गोरियासी । सहकुटुंबेंसी विठा नाही ॥१॥
मृत्तिका आणावयाची नाही जाहली वेळ । गेलासे समूळ न पडे दृष्टी ॥२॥
ऐकतांचि ऐसी ज्ञानदेवें गोठी । गोरियासी कंठी धरियेले ॥३॥
परदेशी नोहे पंढरीपणा । केलेंसे कारणा कार्य तुझे ॥४॥
आमुतें न भेटे जाहला असे गुप्त । एका जनार्दनी मात प्रगटली ॥५॥
