(सीताशोक)
3644.
(सीताशोक)
रामराम उत्तम अक्षरे । कंठी धरिली आपण शंकरे ॥१॥
कैसी तारक उत्तम तिही लोका । हळाहळ शीतळ केले शिवा देखा ॥धृपद॥
हाचि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥२॥
जुन्हाट नागर नीच नवे । तुका म्हणे म्या धरिले जीवे भावे ॥३॥
अर्थ :
रामराम ही अक्षरे अतिशय उत्तम आहेत भगवान शंकराने स्वत: आपल्या कंठामध्ये ही दोन अक्षरे धरली आहेत. हे रामनाम त्रिभूवनात लोकांना तारणारी उत्तम साधन आहे ज्यावेळी भगवान शंकराने मंथनामध्ये निघालेले हलाहल विष प्राशन केले त्यावेळी त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला व त्यांनी रामनाम जप करुन दाह शीतल केला. हाच मंत्र भगवान शंकरांनी पार्वतीला केला व तिच्या गर्भादी योनी चुकल्या. तुकाराम महाराज म्हणतात, रामनाम हे अतिशय अनादी असून सुंदर व नित्य नवे आनंद देणारे आहे त्यामुळे मी जीवेभावे माझ्या कंठात ते धारण केले आहे.
