वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 141. गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३

आषाढीची यात्रा आला प

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087397 · अभंग क्र. ३६५३

3653.
आषाढीची यात्रा आला पर्वकाळ । निघाला संतमेळ पंढरीसी ॥१॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताई । आणिकही अनुभवी संत बहु ॥२॥
येता त्याची मार्गे तेरेसी ते आले । तिही पुशियेलें गोरोबासी ॥३॥
गावांतील जन सांगती प्रकार । गोरियाचा विचार जाहला सर्व ॥४॥
परदेशी कुंभार पंढरीचा विठा । राहिलासे वांटा करुनियां ॥५॥
ज्ञानदेव खूण आणितली मनी । एका जनार्दनी पाहू त्याते ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग