(कोडे)
3672.
(कोडे)
नुगवे ते उगवून सांगितले भाई । घालुनिया ताळा आता शुद्ध राखा घाई ॥१॥
आता काही नाही राहिले । म्या आपणा आपण पाहिले ॥धृपद॥
कमाईस मोल येथे नका रीस मानू । निवडू नये मज कोणा येथे वानू ॥२॥
तुका म्हणे पदोपदी कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळी ॥३॥
अर्थ :
भावांनो, तुम्हाला स्वताच्या बुद्धीने कोडे उलगडता आले नाही, ते मी उगडून सांगितले. आता अनुभवाशि ताळा घ्या व त्वरेने शुद्ध भाव ठेवा. मी आत्मरूप पाहिले आता काही कर्तव्य राहिले नाही. मोक्षाची कमाई मोलाची आहे म्हणून मोक्षप्राप्तिचा कंटाळा करू नका. या ठिकाणी मला कोणचीही निवड करण्याचा निर्णय घेता येत नाही. तुम्ही स्वता आपण बद्ध आहोत की मुक्त आहोत हे अनुभवावरुन ठरवा. तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक वेळी वनमाळी श्रीकृष्णचे स्मरण करा. कधीतरी तुमचा विजय होईल आणि शेवटी त्याचे दर्शन तुम्हाला होईल.
