वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(काला व खेळया संबंधी

🙏 3. संत तुकाराम · ABH-079505 · अभंग क्र. ३६७३

3673.
(काला व खेळया संबंधीचे अभंग)
हा रस आनंदाचा । घोष करा हरीनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥
पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचे संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥धृपद॥
काय पाहाता हे भाई । हरुषे नाचा धरा घाई । पोटभरी काही । घेता उरी न ठेवा ॥२॥
जे सुख दृष्टी आहे । तेंच अंतरी जो लाहे । तुका म्हणे काय । कळिकाळ ते बापुडे ॥३॥

अर्थ :
हरिनामाचा जयघोष करण्याच्या भक्तिरसात मोठा आनंद भरलेला आहे जो भाग्यवान असेल, त्याच्या वाटेल तो येईल. अनेक जन्माची पुण्याई असलेला भक्तिचा अधिकारी होईल. अरे बंधुनो, नुसते बघत राहु नका आता घाई धरा आणि आनंदाने नामाच्या छंदात नाचा भक्तिरसाने मन तृप्त होईपर्यंत त्याचे सेवन करा त्यात संकोच करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, हरिच्या सगुण रूपाच्या दर्शनाने सुख अंत:करणात ठसेल कळिकाळहि त्याच्यापुढे हतबल आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग