गोरियाचे कांता आनंदल
3662.
गोरियाचे कांता आनंदली चित्ती । वंदिली माता ती रुक्मादेवी ॥१॥ रुक्मादेवी म्हणे न करा काही चिंता । शपथ सर्वथा मुक्त होय ॥२॥ ऐसे भक्तचरित्र ऐकता कान । होतसे नाशन महापापा ॥३॥ एका जनार्दनी पुरले मनोरथ । रामनाम गर्जत आनंदेसी ॥४॥
