सांवतामाळीचरित्र - अ
3664.
सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६
भक्ताचे मनोरथ पुरवी नारायण । अवतार म्हणोनी धरी स्वये ॥१॥ नामदेवाप्रती जाहला अभिमान । लाडिकाचि पूर्ण मी तो भक्त ॥२॥ कौतुक दावावया माव देव करिती । नामदेवाप्रती काय बोले ॥३॥ एका जनार्दनी परिसा सादर । देव भक्तांचा परिकर संवाद तो ॥४॥
