वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(घोंगडीची रूपके)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079912 · अभंग क्र. ३६६३

3663.
(घोंगडीची रूपके)
मी माझे करित होतो जतन । भीतरिल्या चोरे घेतले खान ॥१॥
मज आल्याविण आधीच होता । मज न कळता मज माजी ॥धृपद॥
घोंगडे नेले घोंगडे नेले । उघडे केले उघडेंचि ॥२॥
तुका म्हणे चोरटा चि झाला साव । सहज न्याय नाही तेथे ॥३॥

अर्थ :
मी माझ्या घोंगडीचे आतापर्यंत चांगले जतन करत होतो परंतू अंत:करणात लपलेल्या देवानेच त्याच्यावर हल्ला चढवून सर्व लुटून नेले. मला जन्माला यायच्या आधीच तो माझ्यामधे लपून बसला होता हे देखील मला कळले नव्हते. मी जन्माला आलो त्यावेळीच उपाधीरहित होतो म्हणजे उघडा होतो परंतू मायेचे आवरण माझ्यावर पडले व मी पुन्हा उपाधीत गुंतलो व देवाने माझे घोंगडे नेले माझे घोंगडे देव घेऊनच गेला त्यामुळे मी उपाधीरहित होतो मायेच्या आवरणाने पुन्हा बंधनात गुंतलो व देवाने पुन्हा माझे घोंगडे चोरुन पुन्हा मला उपाधीरहित केले म्हणजे उघडे केले. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव साव चोर आहे याच्याजवळ कोणत्याही प्रकारचा न्याय राहिला नाही. (तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपला कोणत्याही उपाधींशी संबंध राहिला नाही याविषयी समाधान व्यक्त केले आहे. )

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग