गोरियानें केला मनासी
3644.
गोरियानें केला मनासीं विचार । हाचि एक निर्धार बरा जाहला ॥१॥
लिगाड ते आपोआप मावळले । विषयांचे जाहलें तोंड काळे ॥२॥
विठ्ठले करुणा केली सर्वपरी । तारियेलें भवपुरीं संसाराचे ॥३॥
एका जनार्दनी खुंटला वेव्हार । नाही आन विचार प्रपंचाचा ॥४॥
