(काला)
3689.
(काला)
शिंके लावियेले दुरी । होतो तिघांचे मी वरी ॥१॥
तुम्ही व्हारे दोहीकडे । मुख पसरूनि गडे ॥धृपद॥
वाहाती त्या धारा । घ्यारे दोहीच्या कोंपरा ॥२॥
तुका म्हणे हाती टोका । अधिक उणे नेदी एका ॥३॥
अर्थ :
गोरसाचे शिंकाळ फार उंच लावले आहे. त्यात हात घालण्यास मी तुम्हा तिघांच्या खांद्यावर चढतो. गड्यांनो, तुम्ही आपले दोन बाजूंना तोंड उघडून नीट उभे रहा. दोन्ही कोपर्यातून शिंक्यातील धारा वाहतील, त्या धारा नीट तोंडात घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हाताकडे लक्ष दया. सर्वांना मी सारखे देणार आहे.
