(हमामा)
3684.
(हमामा)
हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालिता ठकले पोर । करी येरझार चौर्यांशीची ॥१॥
पहिले पहारा रंगासि आले । सोहं सोहं से बार घेतले । देखोनि गडी ते विसरले । डाई पडिले आपणची ॥धृपद॥
दुसर्या पहारा महा आनंदे । हमामा घाली छंदछंदे । दिस वाडे तो गोड वाटे । परि पुढे नेणे पोर काय होते ते ॥२॥
तिसर्या पहारा घेतला बार । अहंपणे पाय न राहे स्थिर । सोसे सोस करिता डाई पडसी । सत्य जाणे हा निर्धार ॥३॥
चौथ्या पहारा हमामा । घालिसी कापविसी हातपाय । सुर्यापाटिलाचा पोर यम्या । त्यांचे पडलीस डाई रे ॥४॥
हमामा घालिता भ्याला तुका । त्याने सांडिली गड्याची सोई । यादवाचा मूल एक । विठोबा त्यासवे चारितो गाई रे ॥५॥
अर्थ :
पोरा, हमामा रे हमामा हमामा खेळतांनी जर तू फसलास तर चौर्यांशी लक्ष योनीची येरझार करीत राहशील. गर्भावस्थेचा पहिल्या प्रहरात रंगात येउन तु 'सोऽह 'सोऽहं’ चा छंद घेतलास, नंतर संसारातले गडी दिसले तेव्हा सोऽह विसरलास आणि स्वत: होऊन त्या प्रपंच्याच्या डावात पडलास. बालपनणाच्या दुसऱ्या प्रहरात महानंद छंद घेऊन तू हामामा घालू लागलास दिवस जात होते तस तसे गोड वाटत होते; पण पुढे काय होणार, हे कळत नव्हते. तारुण्याच्या तिसऱ्या प्रहरात अहंपणाचा छंद लागला व त्यामुळे एक ठिकाणी पाय स्थीर राहिना प्रपंच्याचा हव्यस करता करता प्रपंचाच्या डावत पडशील, हे मात्र नक्की समज. म्हातारपणाच्या चौथ्या प्रहरात हमामा करतांना हात पाय लटपटू लागले सूर्यदेव पाटलाचा यम हा पोरगा आहे त्याच्या डावात पडशील रे बाबा!. तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच्याचा हामामा घालताना मी भीउन
