राहिला हरि लक्ष्मीसह
3652.
राहिला हरि लक्ष्मीसहित घरी । दैन्य सहपरिवारी पळोनी गेले ॥१॥
उठोनी पहाटे गरुडा खोगीर घाली । मृत्तिका वहिली वरी आणी ॥२॥
भाजनें ती नानापरी करी । नाटकी मुरारी चाळक जो ॥३॥
ऐसे सुखरुप राहिले निर्धारे । न कळे विचार गोरोबासी ॥४॥
एका जनार्दनी पुढे काय जाहले । सर्व दैन्य गेले गोरोबाचें ॥५॥
