पंढरीची मात सांगे ना
3678.
पंढरीची मात सांगे नारदमुनी । संतांचे कीर्तनी नाचे देव ॥१॥ नामाच्या गजरें नाचताती संत । सुरवरांचा तेथे काय पाड ॥२॥ तिही लोका पाहता ऐसे नाही कोठे । कैवल्याची पेठ पंढरी देखा ॥३॥ ऐकोनी अमरनाथ संतोषला मनी । एका जनार्दनी नारद सांगे ॥४॥
