ऐसे बहुत दिन तयांसी
3646.
ऐसे बहुत दिन तयांसी लोटले । उभयतां कळले गुज त्याचे ॥१॥
स्त्रियेचे चरित्र न कळे ब्रम्हादिकां । उभयतां विचार देखा करिताती ॥२॥
दोघी दो बाजूंस करिती शयन । कर उचलोनि धरती ह्रदयीं ॥३॥
सावध होउनी पाहे कर चोरी गेला । एका जनार्दनी त्याला शिक्षा करु ॥४॥
