(काला व खेळया संबंधी
3677.
(काला व खेळया संबंधीचे अभंग)
काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । झाली आता वेळ । म्हणती आणा सिदोर्या ॥१॥
देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडा । दोंदिल बोबडा । वांकड्याचा हरी मेळी ॥धृपद॥
आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनिया गोडी । हरी मेळवी त्यांत ते ॥२॥
भार वागविला खांदी । नव्हती मिळाली जो मांदी । सकाळांचे संदी । वोझी अवघी उतरली ॥३॥
मागे जो तांतडी । त्यासि रागा येती गडी । तुझी का रे कुडी । येथे मिथ्या भावना ॥४॥
एक एकाच्या संवादे । कैसे धाले ब्रम्हानंदे । तुका म्हणे पदे । या रे वंदू हरीची ॥५॥
अर्थ :
आपापले काम आटोपुन सर्व गोपाळ एका ठिकाणी जमले. आता जेवनाची वेळ झाली. आपल्या शिदोर्या आना. सर्वांनी आपापल्या पापपुण्याचा हिशोब त्याच्या जवळ दिला इंद्रियरूपि गाईना अंत:करनिरूपि गोठ्यात बसविले. हरिच्या सोबत दोंदिल, बोबडा, वाकडया, पेंद्द्या या नावाचे गोपाळ होते. आपल्या आवडिप्रमाणे त्यांनी पंगतित मुद्रा बांधल्या. हरिने आपली आवडती शिदोरि खोलुन त्यात स्वत:चि गोड़ी मिळवली. पाप-पुण्यात्मक शिदोरिचा भार त्यांनी शुद्ध भक्तिभाव समुदायाचा योग आला नव्हता तो पर्यन्त आपल्या माथि वागविला. परमार्थ लक्षणाचा योग सगळ्यांच्या ठिकाणी आलेला पाहुन श्रीहरींने सर्वांच्या पाप-पुण्याची शिदोर्यांची ओझी उतरविली. जो घाइने, उतावीळ पणाने मागतो, त्याच्यावर बाकीचे सवंगडी रागवतत व त्याला म्हणतात, मला मिळेल की नाही, अशी खोटी भावना मनात का ठेवतोस ?. त्यांचा एकमेकांशी जो संवाद झाला, त्याने ते गोपाळ ब्रम्हनंदात तृप्त झाले. तुकाराम महाराज म्हणतात, ते गोपाळ म्हणू ला
