चोखियाची भक्ति कैसी
3684.
चोखियाची भक्ति कैसी । प्रेमे आवड देवासी ॥१॥ ढोरें वोढी त्याचे घरी । नीच काम सर्व करी ॥२॥ त्याचे स्त्रीचे बाळंतपण । स्वये करी जनार्दन ॥३॥ ऐसी आवड भक्तासी देखा । देव भुलले तया सुखा ॥४॥ नीच याती न मनी कांही । एका जनार्दनी भुलला पाही ॥५॥ :::::::::::::::::::::::::{}:::::::::::::::::::::::::
