वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(सीताशोक)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079884 · अभंग क्र. ३६४८

3648.
(सीताशोक)
केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥१॥
लंकाराज्ये बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥धृपद॥
औदार्‍याची सीमा । काय वर्णु रघुरामा ॥२॥
तुका म्हणे माझा दाता । रामे सोडविली सीता ॥३॥

अर्थ :
प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करुन त्याचा भवसागरातील सर्व उपाधींचा संबंधच तोडून टाकला. लंकेच्या राज्यावर बिभिषणाला बसविले व त्याची तेथे चिरकाल स्थापना केली. हे रघुरामा तुझ्या औदार्‍याची सीमा काय वर्णन करावी. तुकाराम महाराज म्हणतात, माझा दाता प्रभू श्रीरामचंद्र याने सीतामातेला लंकेतून सोडविले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग