वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 145. जोशी ३६८९ ते ३६९३

येथुनि पुढे बरें होई

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090310 · अभंग क्र. ३६९२

3692.
येथुनि पुढे बरें होईल । भक्‍तिसुखे दोंद वाढेल । फेरा चौर्‍यांशीचा चुकेल । धन मोकाशी ॥१॥ मी आलो रायाचा जोशी । होर ऎका दादांनो॥ध्रु॥मनाजी पाटील देहगावचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥ वासना बायको शेजारिण । झगडा घाली मोठी दारुण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी॥३ । एका जनार्दन कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‌गुरुंसी । फेर चुकवा चौर्‍याऎंशी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग