कुल्लाळ वंशांत गोरा
3663.
कुल्लाळ वंशांत गोरा कुंभार । कीर्ति चराचर भरियेले ॥१॥ प्रतिज्ञा करुनी करकमळ तोडी । भाजनेंही घडी श्रीविठ्ठल ॥२॥ नाम निरंतर वदतसे वाचे । प्रेम मी तयाचे काय वानू ॥३॥ एका जनार्दनी भक्ताचा कैवारी । भाजनें ती करी घरी त्याच्या ॥४॥
