पाहूनिया गोरा दंडवत
3651.
पाहूनिया गोरा दंडवत घाली । म्हणे कोण स्थळीं वस्ती तुम्हा ॥१॥
पंढरीसी राहतों परदेशी आम्ही । नाम तरी स्वामीं विठु माझे ॥२॥
सांगतो कांता आहे बरोबरी । परिवार तरी एवढाचि ॥३॥
ऐकोनिया मात गोरा संतोषला । रहावे कामाला माझे घरी ॥४॥
विठु म्हणे हाचि हेतु धरुनी आलो । एका जनार्दनी जाहलों निर्भय आता ॥५॥
