वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(कोडे)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079679 · अभंग क्र. ३६७१

3671.
(कोडे)
पुसतसे सांगा मी हे माझे ऐसे काई । रुसू नका नुगवे तो झवे आपुली आई ॥१॥
कोडे रे कोडे ऐका हे कोडे । उगवूनि फार राहे गुंतोनिया थोडे ॥धृपद॥
सांगतो हे मूळ काही न धरावी खंती । ज्याले जीवो मेले मरो प्रारब्धा हाती ॥२॥
तुका म्हणे अभिमान सांडावा सकळी । नये अंगावरी वाया येऊ देऊ कळी ॥३॥

अर्थ :
हे लोकहो मी एक कोड विचारीत आहे ते म्हणजे या जगामध्ये मी आणि माझे असे काय आहे माझ्यावर कोणी रुसू नका आणि ज्याला कोडे सुटणार नाही त्याने आपल्या आईशी संबंध केला असे समजावे. हे मी सांगितलेले कोडे तुम्ही ऐका आणि ज्याला मी सांगितलेले कोडे समजले ज्याला ते सुटले मग त्याने प्रपंचामध्ये जरी थोडेफार गुंतून राहिले तरी त्याला कोणत्याही प्रकारचा बाध होणार नाही. या जगामध्ये जगले तर जगू दया मेले तर मरु दया प्रारब्धाने हे होणार आहे कारण प्रारब्धाच्या हाती सर्व आहे त्याविषयी तुम्ही खंत धरु नका हेच मुख्य मूळ मी तुम्हाला सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे सर्व प्रकारचा देहाभिमान टाकून दयावा आणि आपला अंगावर कोणत्याही प्रकारच्या गोष्टी येऊ देऊ नयेत. (काला)

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग