सर्वभावे तुज आलो मी
3673.
सर्वभावे तुज आलो मी शरण । भेटवी निधान वैकुंठीचें ॥१॥ तयावीण प्राण कासावीस होती । भेटवी श्रीपती मजलागी ॥२॥ तुम्ही संत उदार सोइरे निजाचे । दरुशन तयाचे मज करवा ॥३॥ एका जनार्दनी ऐशी भाकी कींव । अभिमान सर्व दुरी गेला ॥४॥