वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(हमामा)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079485 · अभंग क्र. ३६८३

3683.
(हमामा)
मशी पोरा घे रे बार । तुझे बुजीन खालील द्वार ॥१॥
पोरा हमामा रे हमामा रे ॥धृपद॥
मशी हमामा तू घाली । पोरा वरी सांभाळी खाली ॥२॥
तरीच मशी बोल । पोरा जिव्हाळ्याची ओल ॥३॥
मशी घेता भाष । जीवा मीतूपणा नाश ॥४॥
मज सवे खरा । पण जाऊ नेदी घरा ॥५॥
आमुचिये रंगी । दुजे तगेना ये संगी ॥६॥
तुकयासवे भास । हरी जीवा करी नास ॥७॥

अर्थ :
पोरा, माझ्याशी एकदा हमामा ( विशिष्ट प्रकारचा खेळ ) खेळ म्हणजे तुझे खालचे अधोगतीचे दार मिटऊंन टाकिन. ए पोरा, अरे हमामा-हमामा खेळ. माझ्याशी हमामा खेळताना तू खाली-वर सांभाळ. पोरा, अरे, तुझ्या आत जिव्हाळ्याचा ओलावा असेल, तरच माझ्याशी बोल. माझ्याशी बोलताना तुझ्या मी- तु पणाचा नाश होईल. तू माझ्या बरोबर आहेस खरा, पण तुला प्रपंच्याकडे फिरु देणार नाही. आमच्या रंगाच्या संगतित व्दैत टिकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याशी भाषण केले तर मी जीवपणाचे हरन करतो व त्याचा नाश करतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग